मीडियापासून मुलीचा चेहरा लपवत होती शिल्पा शेट्टी, पण तरीही कॅमे-यांत कैद झाली मुलीची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 03:09 PM2020-11-20T15:09:42+5:302020-11-20T15:20:02+5:30

दुसर्‍यांदा आई झाल्यानंतर शिल्पा शेट्टी खूप खुश आहे आणि सोशल मीडियावरही तिने आपला आनंद व्यक्त केला होता. शिल्पा तिच्या मुलांसह नेहमीच वेगवेगळ्या अक्टीव्हीटी करतानाचे फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर मुलगी समिषाचे एकही फोटो शेअर केला नव्हता. नुकतीच शिल्पाला मुलीसह मीडियाच्या कॅमे-यांनी कैद केले आहे.

मीडियाला पाहताच शिल्पाही थोडी दचकलीच पण फोटोग्राफरकडे पहात असताना समीषाचा चेहरादेखील लपवताना दिसत आहे.

शिल्पाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते आणि ही संधी शेवटी आली.

शिल्पा शेट्टीची मुलगी समिषाचा चेहरा ताज्या फोटोंमध्ये दिसत आहे.

समीषा खूप गोंडस दिसत आहे. जरी त्यांची केवळ एक झलक कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असली तरी पहिल्यांदा चाहत्यांना समीषाचा चेहरा पाहता आला आहे.

अनेक कौटुंबिक फोटोंमध्येसुद्धा समिषाची उपस्थिती दिसून आली आहे, परंतु तिचा चेहरा कोणत्याही फोटोत दिसला नव्हता.

शिल्पा शेट्टीने सरोगसीच्या मदतीने समिषाला जन्म दिला. समीषाचा जन्म 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाला होता.

या व्यतिरिक्त शिल्पाचा मुलगा वियान राज कुंद्रा यांचा जन्म 21 मे 2012 रोजी झाला होता.

वियान सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे.

शिल्पा शेट्टीनेही डॉटर्स डे वर समीषाबरोबर एक फोटो शेअर केला आणि आपल्या भावना चाहत्यांसह शेअर केल्या होत्या.