IN PICS : शाहरूखपासून शिल्पा शेट्टीपर्यंत... या सर्व स्टार्सचे आहेत अनेक साईड बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:08 PM2021-07-21T16:08:15+5:302021-07-21T17:01:50+5:30

बॉलिवूडचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांवर अवलंबून नाहीत. तर अनेकांचे साईड बिझनेस आहेत. चित्रपटांसोबतच या साईड बिझनेसमधून हे स्टार्स बक्कळ कमाई करतात.

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये सहभागी आहे. तिने स्वत:चे एक प्रॉडक्शन हाऊसही सुरु केले असून त्याद्वारे एका सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे. इतकेच नाही तर ती Iosis या स्पा आणि सलूनच्या चेनची सहमालकही आहे. त्यासोबतच तिने योगाची डिव्हीडी सुद्धा लॉन्च केली आहे.

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानचे 'रेड चिलीज' नावाचे एक प्रॉडक्शन हाऊस आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर या आयपीएल टीमचा तो को-ओनर आहे.

दीपिका जितकी यशस्वी अभिनेत्री आहे तितकीच ती एक यशस्वी बिझनेस वुमन सुद्धा आहे. दीपिकाने काही वर्षांपूर्वी ऑनलाईन फॅशन ब्रँड ऑल अबाऊट यु लॉन्च केला होता. तिचा हा ब्रँड मिंत्रा या ऑनलाईन साइटवर उपलब्ध आहे.

अनुष्का शर्मा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, सोबत एक यशस्वी बिझनेस वुमन सुद्धा आहे. अनुष्काने तिच्या भावासोबत क्लीन स्लेट फिल्म्स ही प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन कंपनी उघडली. अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत एन एच 10, फिल्लौरी, परी यांसारखे चित्रपट प्रोड्यूस केले. एवढेच नव्हे तर तिने यावर्षी पाताळलोक या वेब सिरीजची निर्मिती करून वेब दुनियेत पाऊल ठेवले. याव्यतिरिक्त Nush हा अनुष्काचा एक क्लोथिंग ब्रँड आहे.

भाईजान सलमान खानचा बीइंग ह्यूमन नावाचा लोकप्रिय ब्रँड आहे. त्याचे एक प्रॉडक्शन हाउस देखील आहे

अनेक सिनेमात काम केल्यानंतर जॉनने एका फिल्म प्रॉडक्शन कंपनीची सुरुवात केली. विकी डोनर हा याच प्रॉडक्शन हाऊसचा सिनेमा होता. मीडिया रिपोर्टनुसार, जॉन फिटनेस फ्रॅचायजी सुरु करण्याच्या तयारीत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकतेच न्यूयॉर्कमध्ये रेस्टारंट सुरु केले. ‘सोना’ नावाने सुरु केलेल्या तिच्या या रेस्टॉरंटची सध्या जोरदार चर्चा आहे. तिचे पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाचे प्रॉडक्शन हाउस आहे.

हृतिक रोशन एक जीमचा मालक आहे. त्यासोबतच त्याचा कपड्यांचा HRX ब्रँड देखील लोकप्रिय आहे.

सुश्मिता सेन ही आता एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचे दुबईमध्ये ज्वेलरीचे रिटेल स्टोर आहे. तसेच हॉटेल्स सुरु करण्याचा तिचा विचार सुरु आहे.

सुनील शेट्टी हा सर्वात बिझनेसच्या बाबतीत सर्वात हुशार अभिनेता मानला जातो. त्याने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जिमला सुरुवात केली होती. तसेच त्याने पॉपकॉर्न एन्टटेन्मेंट नावाने प्रॉडक्शन हाऊसही सुरु केलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, त्याचा बिझनेस इथेच संपला तर नाही. त्याचा बुटीकचाही व्यवसाय आहे. तसच त्याची अनेक हॉटेल्सही आहेत. हे सगळं करुन तो काही टीव्हीवर काही शो सुद्धा होस्ट करतो.

ट्विंकल अनेक बिझनेस करते. तिने एक कॅन्डल आणि इंटेरिअर डिझायनिंगची कंपनी सुरु केली. तसेच ती पेपरमध्ये कॉलमही लिहिते. ट्विंकलने दोन पुस्तकेही लिहिले आहेत. सोबतचे तिने प्रॉडक्शन हाऊसही सुरु केले आहे. 'पॅडमॅन' हा या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा आहे.

अजय देवगण याने वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्याने गुजरातमधील चारनाका सोलर प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले आहेत. तसेच त्याने रोहा ग्रुपमध्येही कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. तसेच त्याने अजय देवगण फिल्म्स नावाने प्रॉडक्शन हाऊसही सुरु केलं आहे. त्याने VFX Studio सुद्धा खरेदी केलं आहे.

सनी लिओनी सुद्धा बिझनेसच्या मामल्यात मागे नाही. सनी एकेकाळी अ‍ॅडल्ट स्टार होती. बिझनेससाठीही तिने अ‍ॅडल्ट स्टोर सुरु केले आहे. यात अ‍ॅडल्ट टॉईज, पार्टी विअर, स्वीम विअर सारखे प्रॉडक्ट विकल्या जातात. याशिवाय ती ‘लस्ट’ नामक एक परफ्यूम आणि कॉस्मेटिक लाइनही चालवते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!