Shamita shetty spoken about her marriage and life partne/
बाबो! लग्नासाठी उतावळी झालीय शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी, पण ही आहे अडचण By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:44 AM2021-03-06T10:44:49+5:302021-03-06T11:19:46+5:30Join usJoin usNext शमिताने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मोहब्बतें’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. (Photo Instagram) या चित्रपटासाठी तिला आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.(Photo Instagram) यानंतर ती काही चित्रपटात दिसली आणि आली तशी गायब झाली. पण म्हणवं तसं बहीण शिल्पा शेट्टी प्रमाणे तिला मिळालं नाही. (Photo Instagram) चित्रपटांत डाळ शिजत नाही म्हटल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. बिग बॉस 3, खतरों के खिलाडी 9, झलक दिखला जा 8 अशा काही रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक बनून आली. . (Photo Instagram) चित्रपटांपासून दूर असलेली शमिता शेट्टी नुकतीच 'ब्लॅक व्हिडो' या वेब सिरीजमध्ये दिसली. अभिनेत्रीने आता तिच्या लग्नाविषयी येणाऱ्या समस्येविषयीही सांगितले आहे. (Photo Instagram) शमिता शेट्टी हिने हिंदुस्तान टाईम्स डॉट कॉमशी बोलताना सांगितले की तिला लग्न करायचे आहे पण तिच्या मार्गात एक अडथळा आहे. (Photo Instagram) शमिता शेट्टी म्हणाली, 'मला लग्न करायचं आहे पण माझा होणारा पती कुठे आहे हे मला माहिती नाही. तो कुठेतरी आहे, आणि त्याने मला शोधावं. माझ्या मनातील गोष्टी मी कोणापासून लपवून ठेवत नही आणि म्हणूनच मी नेहमी अडचणीत सापडते पण मला प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. (Photo Instagram) शमिताने तिचे शिक्षण सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये केले. तिने सेडेनहॅम कॉलेजमधून पदवी घेतली. इतकेच नाही तर शमिताने मुंबईतील महाविद्यालयातून डिझाईन डिझायनिंगचा अभ्यासही केला. (Photo Instagram) .टॅग्स :शिल्पा शेट्टीShilpa Shetty