IN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:00 AM2020-08-04T08:00:00+5:302020-08-04T08:00:09+5:30

आज शमाचा वाढदिवस...

अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पण काही वर्षांपूर्वी ती अशी नव्हतीच. होय, तिचे जुने फोटो पाहाल तर तुम्हालाही क्षणभर विश्वास बसणार नाही.

शमाने टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ये मेरी लाइफ है’ या मालिकेने ती प्रकाशझोतात आली.

टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली. पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना.

शमाचे बदलेलला लूक, तिच्या अदा पाहून सगळेच हैराण झाले होते.

7 वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होती. याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इतकी की, एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

झोपेच्या गोळ्या खाऊन शमाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र आता शमा या डिप्रेशनमधून, आजारातून बाहेर पडली आहे.

जानेवारी 2016 साली जेम्स मिलिरॉनसोबत शमाने साखरपुडा केला. दुबईच्या 7 स्टार हॉटेलात हा साखरपुडा पार पडला.

ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये शमााने काम केले आहे.

विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.