निसर्ग...सुख... शांती... ! सारा अली खानच्या लडाख ट्रिपचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:36 PM2021-08-27T18:36:15+5:302021-08-27T18:45:18+5:30

होय, साराने तिच्या लडाख ट्रिपचे काही सुंदर फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. एका फोटोत ती अभिनेत्री राधिका मदान हिच्यासोबत दिसतेय.

सारा अली खानला भटकंतीची किती आवड आहे, हे नव्यानं सांगायला नकोच. नुकतीच सारा लडाखला गेली होती. आता लडाखची ट्रिप म्हटल्यावर त्याचे फोटोही पाहायला मिळणारचं.

होय, साराने तिच्या लडाख ट्रिपचे काही सुंदर फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. साराच्या या फोटोंना कॅप्शनची गरज नाहीच. या फोटोतील साराची शांत मुद्रा खूप काही सांगणारी आहे.

या फोटोत लडाखच्या एका घराबाहेर पायरीवर बसून साराने पोज दिलीये. तिच्यासोबत राधिका मदान दिसतेय.

लडाखच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा फोटो आहे. अर्थात या फोटोतील एक बोर्ड लक्ष वेधून घेतोय. फोटो काढण्यास मनाई असं या बोर्डवर लिहिलेलं आहे. पण साराने कदाचित त्याकडे लक्ष दिले नाही.

विहारातील आणखी एक फोटो साराने शेअर केला आहे. यात ती प्रार्थना करताना पाठमोरी दिसतेय.

एका प्राचीन विहाराबाहेर सारा व राधिकाने एकत्र पोज दिली आहे. या फोटोतील भगवान बुद्धांची शांतचित्त प्रतिमा लक्ष वेधून घेतेय.

लडाखच्या शांत, प्रसन्न वातावरणात हरवून गेलेली सारा या फोटोत दिसतेय.

Read in English