‘फॅमिली मॅन 2’ फेम समांथा अक्कीनेनी व नागा चैतन्य घेणार घटस्फोट? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:24 PM2021-08-31T13:24:16+5:302021-08-31T13:31:35+5:30

समांथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यासोबत लग्न केलं आहे. मात्र अलीकडे या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची पत्नी समांथा अक्कीनेनी हे साऊथचे लोकप्रिय कपल. पण गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये फार काही ऑल वेल नसल्याच्या चर्चा आहेत.

समांथा व नागा चैतन्य या दोघांच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याचे शिवाय दोघेही काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याच्याही चर्चा कानावर पडत आहेत. या चर्चा किती ख-या, किती खोट्या हे कळायला मात्र मार्ग नव्हता.

समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या चर्चांना आणखीच जोर चढला. यानंतर काय तर समांथा आणि नागा चैतन्य घटस्फोट घेणार असल्याचीही चर्चा रंगली.

आत्तापर्यंत समांथा व नागा चैतन्य दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगले होते. पण आता समांथाने एका मुलाखतीत यावर खुलासा केला आहे. या चर्चा ख-या की खोट्या हे तिने सांगितले आहे.

समांथाने नुकतीच ‘द फिल्म कॅमपेन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती तिच्या वैवाहिक आयुष्यावर बोलली. मी असल्या फालतु गोष्टींकडे लक्ष देऊन माझं डोकं खराब करत नाही. अशा चर्चा प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयुष्याचा एक भाग असतात, असे समांथा म्हणाली.

2009 साली मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर समांथा ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थसोबत रिलेशनशीपमध्ये होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

2015 मध्ये समांथा व नागा खºया अर्थाने जवळ आलेत. ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं.

आॅक्टोबर 2017 मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. आधी दाक्षिणात्य पद्धतीने आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही विवाह केला होता. या शाही विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.