सलमान खानच्या या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन, सोशल मीडियाद्वारे दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 03:43 PM2020-03-31T15:43:30+5:302020-03-31T15:52:11+5:30

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचे निधन झाले आहे.

सलमानचा 38 वर्षीय पुतण्या अब्दुल्ला खान उर्फ आबा याचे सोमवारी निधन झाले.

सलमानने खुद्द सोशल मीडयावर याची माहिती दिली आहे.

अब्दुल्ला हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता. अब्दुल्ला खान मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात भरती होता.

अब्दुल्लाच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्याला हृदय आणि मधूमेहाचाही त्रास होता. दोन दिवसांपूर्वी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच सलमान व त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

सलमानने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत माहिती दिली आहे. फोटोत सलमान व अब्दुल्ला एकत्र दिसत आहेत. ‘तुझी सतत आठवण येईल,’ असे सलमानने लिहिले आहे. यावरून अब्दुल्ला सलमानच्या किती जवळ होता, हे लक्षात येते.

अब्दुल्ला एक बॉडी बिल्डर होता. सलमान व अब्दुल्ला या दोघांनी बॉडी बिल्डिंगचे ट्रेनिंग एकत्र घेतले होते. काही काळापूर्वी अब्दुल्लाने जिम उपकरणांचा ब्रँड सुरू केला.

गेल्या वर्षी अब्दुल्लाचा अपघात झाला होता. त्याला अनेक औषध खावी लागत होती. पण 23 मार्चला त्याने औषध घेतले नाही. म्हणून काम करताना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.