सलमान खानचे पनवेलमधील फार्महाउस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:32 PM2021-04-22T15:32:55+5:302021-04-22T15:48:06+5:30

सलमान खानने कोरोनामुळे २०२०मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाउसवर व्यतित केला होता.

सलमान खानने कोरोनामुळे २०२०मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाउसवर व्यतित केला होता. त्याच्या या फार्महाउसला बहिण अर्पिताचे नाव दिले आहे.

सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाउसमध्ये सर्व सोयी सुविधा आहे. तिथे दमदार जिमदेखील आहे. या जिममध्ये लॉकडाउनदरम्यान सलमान आणि लूलिया याच जिममध्ये वर्कआउट करत होते.

सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाउसवर घोडेस्वारीसाठी ट्रॅकदेखील बनवण्यात आले आहेत. सलमानचे घोड्यांवर खूप प्रेम आहे आणि हे जगजाहिर आहे. लॉकडाउनदरम्यान सर्व जवळच्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला होता.

या फार्महाउसवर शेतीदेखील केली जाते.

लॉकडाउनदरम्यान सलमानने शेतातील फोटो शेअर केले होते. त्यावेळी सलमान चिखलाने माखलेला फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

या फार्महाउसमध्ये गार्डनदेखील आहे. जिथे सर्व बसून चहा नाश्ता करतात.

सलमानच्या या फार्महाउसवर मोठे स्विमिंग पूल आहे. या पूलमध्ये मस्ती करताना बऱ्याचदा सलमान दिसला आहे. लूलियादेखील पूलच्या बाजूला बसून योगा करताना दिसते आहे.

सलमानच्या या फार्महाउसच्या आजूबाजूला खूप छान हिरवळ आणि नजारा आहे. जो फोटोत आपल्याला पहायला मिळत आहे.

सलमान खानच्या फार्महाउसवर बरेच सेलिब्रेटी गेले आहेत.

सलमान खान बऱ्याचदा फॅमिलीसोबत पनवेलमधील फार्महाउसवर टाईम स्पेंड करताना दिसतो.