भाईजानचा ‘YES MAN’! कशी व कुठे झाली होती सलमान व शेराची पहिली भेट?

Published: May 11, 2021 05:35 PM2021-05-11T17:35:29+5:302021-05-11T20:44:03+5:30

Salman Khans bodyguard Shera : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा सावली सारखा सोबत राहणारा त्याचा बॉडीगार्ड शेरा हा सुद्धा कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा सावली सारखा सोबत राहणारा त्याचा बॉडीगार्ड शेरा हा सुद्धा कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

सलमान खान बॉडीगार्डशिवाय घराबाहेर पडत नाही. त्याच्या सिक्युरीटीसाठी अनेक बॉडीगार्ड असतात. पण या सगळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक बॉडीगार्ड त्याच्यासोबत सतत असतो या बॉडीगार्डचे नाव शेरा आहे. शेरा हा सावलीप्रमाणे सतत त्याच्या सोबत असतो.

शेरा हा बॉडीगार्ड असला तरी सलमान त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो, अनेकप्रसंगी दोघांमधील बॉन्डिंग दिसले आहे. पण सलमान व शेराची पहिली भेट कशी झाली, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

एका मुलाखतीमध्ये शेरानेच पहिल्यांदा सलमानला कुठे भेटला हे सांगितले आहे. नुकतीच शेराने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमानसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे.

त्याने सांगितले, मी हॉलिवूड सिंगर Whigfieldच्या भारतातील कार्यक्रमासाठी काम करत होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली.

यानंतर हॉलिवूड अभिनेता Keanu Reeves भारतात आला, तेव्हा आम्ही पुन्हा भेटलो. स्पीड प्रदर्शित झाला होता आणि मॅट्रिक्स प्रदर्शित होणार होता. मी सलमानसाठी चंदिगडच्या एका कार्यक्रमात पहिल्यांदा काम केले आणि तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे, असे त्याने सांगितले.

आता मी भाईजानचा फक्त बॉडीगार्ड नाही तर त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे, भाईजान जिथे जातो, तिथे मी त्याच्यासोबत असतो. तो जे सांगतो ते मी करतो, असेही तो म्हणाला.

गेल्या 26 वर्षांपासून शेरा सलमानसाठी काम करत आहे. मध्यंतरी सलमान शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.

शेराचे मानधन हे कोणत्याही कॉपोर्रेटमधील अधिका-यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. रिपोर्टनुसार, शेराला सलमानकडून वर्षाला दोन कोटी रुपये म्हणजेच महिन्याला 16 लाख रुपये मिळतात.

गेल्या अनेक वर्षांत शेरा हा सलमानच्या कुटुंबीयातील एक भाग बनला आहे. शेराच्या सुखदु:खाच्या प्रसंगी सलमान देखील घरातील एका सदस्याप्रमाणे सामील होतो.सलमानच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला देखील आपल्याला त्याचे शेरासोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!