बाबो! ‘सडक 2’आधी या व्हिडीओंनीही केला आहे Dislikesचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:00 PM2020-08-14T17:00:03+5:302020-08-14T17:30:42+5:30

लोकांनी नापसंत केलेत हे व्हिडीओ, पाहा यादी...

नेपोटिजमच्या मुद्यावरून नेटक-यांनी आलिया भटच्या ‘सडक 2’ या आगामी सिनेमाला लक्ष्य केले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवर नेटक-यांनी डिसलाईक्सचा अक्षरश: भडीमार केला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला 60 लाखांवर डिसलाईक्स मिळाले आहेत. पण लाखांवर डिसलाईक्स मिळवणारा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीही अनेक व्हिडीओ नेटक-यांनी नापसंत केले आहेत. त्यावर एक नजर...

युट्यूब रिवाईंड 2018 - 6 डिसेंबर 2018 रोजी रिलीज झालेल्या या व्हिडीओला सुमारे 86.34 लोकांनी नाकारले होते. या व्हिडीओला 1 कोटी 80 लाख डिसलाईक मिळाले होते.

बेबी - पॉपस्टार जस्टिन बीबरचे ‘बेबी’ हे गाणे भलेही तरूणाईचे आवडते गाणे ठरले असेल. पण युट्यूबवर या गाण्याला फार पसंती मिळाली नव्हती.19 फेब्रुवारी 2010 रोजी रिलीज झालेल्या या गाण्याच्या व्हिडीओला 1 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक डिसलाईक मिळाले होते.

युट्यूब रिवाईंड 2019 - 2018 प्रमाणेच 2019 चा हा व्हिडीओ सुद्धा युजर्सला फार आवडला नव्हता. 5 डिसेंबर 2019 रोजी रिलीज या व्हिडीओला सुमारे जळपास 90 लाख डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ७२.६९ टक्के लोकांनी या व्हिडीओला नापसंती दर्शवली होती.

बेबी शार्क डांस - हे गाणे अमेरिका आणि अन्य देशांतील मुलांचे फेवरेट सॉन्ग आहे. मात्र रिलीज झाले तेव्हा या गाण्याला 80 लाख डिसलाईक्स मिळाले होते.

जॉनी जॉनी यस पापा - 8 ऑक्टोंबर 2016 रोजी प्रदर्शित हा व्हिडीओ खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आला होता. पण कदाचित व्हिडीओ व्हर्जन आवडले नव्हते. या व्हिडीओला सुमारे 80 लाख डिसलाईक मिळाले होते.

प्युडीपायचा कॅन धिस व्हिडीओ गेट्स वन मिलियन डिसलाईक - हा व्हिडीओ तयार करणा-या प्युडीपायला खरे तर डिसलाईक्सचा विक्रम करायचा होता. झालेही तसेच युट्यूबवरील 93 टक्के नेटकºयांना हा व्हिडीओ डिसलाईक्स केला होता.

इट्स एव्हरीबडी ब्रो फिट टीम 10 - हे गाणे 2017 मध्ये रिलीज झाले होते. हा व्हिडीओ 40 लाखांवर लोकांनी नापसंत केला होता.

टॅग्स :सडक 2Sadak 2