काय होतीस तू काय झालीस तू, अवघ्या सात महिन्यात रिया चक्रवर्तीचा बदलला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:35 PM2021-01-23T12:35:31+5:302021-01-23T12:41:29+5:30

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली रिया चक्रवर्ती अचानक चर्चेत आली. एक दिवस नव्हता जेव्हा रियाची चर्चा झाली नाही. सुशांतचे नवा निघताच रियावरही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या नंतर सगळं काही होत्याचं नव्हतं झाले.

रियाच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

अतिशय ग्लॅमरस लाईफस्टाइल मेंटेन करणारी रियाचे विविध लूक तुम्हाला पाहायला मिळतील.

तिच्या फोटोवरुन तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचाही अंदाज येईल.

तिच्या फोटोवरुन तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचाही अंदाज येईल.

काही दिवसांपूर्वीच नवीन घराच्या शोधात रिया असल्याचेही फोटो समोर आले होते.

रिया राहत असलेल्या घरात सोसायटीने त्यांना ते घर सोडण्यास सांगितले होते.

इतकेच काय तर काही दिवसांपूर्वीच रियाचे नवीन फोटो समोर आले.

या फोटोत रिया फुटपाथवरच्या फुलांच्या दुकानात जाताना व फुले खरेदी करताना दिसत आहे.

रिया दिसताच फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिच्या मागे धावत असतात.यामुळे रिया काहीशी नाराज असते.

''यार फूल खरीदने आई हूं, जाओ यहाँ से , असे ती मीडिया फोटोग्राफर्स म्हणाली होती.

रियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सने तिला ‘सुशांतच्या वाढदिवसाआधीचा ड्रामा’ असे लिहित तिला ट्रोल केले होते.

लवकरच रिया पुन्हा एखदा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत.

हळूहळू सर्वकाही विसरत रियाचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येत आहे.