'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:58 AM2020-08-04T11:58:20+5:302020-08-04T12:08:42+5:30

'तेरे नाम' सिनेमात अभिनेत्री राधिका चौधरी भिकारीची भूमिका साकारत सा-यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या नावामुळे ती पटकन लक्षात येत नसली तरी भूमिकेमुळे आजही रसिक तिला ओळखतात.

रूपेरी पडद्यावर राधिकाने साकारलेली भूमिका अतिशय छोटी असली तरी लक्षवेधी ठरली.

सिनेमातील तिचा लूक पाहून तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही की, ख-या आयुष्यात ती इतकी सुंदर दिसू शकते.

'तेरे नाम' सिनेमा हा तमिळ तामिळ सिनेमाचा रीमेक होता. एक लहान पात्र होत ते म्हणजे ‘भिकारीचे.'

विशेष म्हणजे सिनेमात सलमान खान, भूमिका चावला सारखी लोकप्रिय चेहरे असूनही राधिकाची भूमिका रसिकांच्या खास पसंतीस पात्र ठरली.

सोशल मीडियावर राधिका चौधरीचे फोटो व्हारल झाले आहेत.

राधिका बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध नसली तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती खूप लोकप्रिय आहे.

30 हून अधिक सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.

राधिका गेल्या काही वर्षांपासून चंदेरी दुनियेपासून लांब आहे. तिचे खासगी आयुष्य ती सध्या एन्जॉय करते आहे.