म्हणून सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी स्वतःच मुल होवू दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 12:44 PM2020-11-21T12:44:07+5:302020-11-21T12:52:52+5:30

आज अभिनेत्री हेलन त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलीवुडच्या सिनेमात आज विविध आयटम गर्ल आपला डान्स, मादक अदांनी रसिकांना घायाळ करतात.

सिनेमाला यशस्वी करण्यासाठी त्यात गाण्यांसोबत एक तरी आयटम डान्स असावा असा निर्माता आणि दिग्दर्शकांचा आग्रह असतो. याच आयटम डान्समुळे सिनेमाची वेगळी प्रसिद्धी होते. त्यामुळेच सध्या आयटम नंबर आणि आयटम गर्ल्सचा जमाना आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

हिंदी सिनेमांमध्ये आयटम नंबर सुरु करण्याचं श्रेय हे हेलन यांनाच जातं. दिलखेचक अदा, घायाळ करणारं नृत्य यानं हेलन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. कॅब्रे डान्स भारतात लोकप्रिय करण्याचं श्रेयसुद्धा हेलन यांनाच जातं.

वयाच्या 19 वर्षी त्यांना 'हावडा ब्रिज' या सिनेमात पहिली संधी मिळाली. यातील 'मेरा नाम चुन चुन' या गाण्याने रसिकांना वेड लावलं. यामुळे बॉलीवुडच्या पहिल्या आयटम गर्ल अशी ओळख त्यांना मिळाली.

60च्या दशकात हेलन यांच्याकडे सेक्स सिम्बल म्हणून पाहिलं जाऊ लागलं. हेलन यांनी आपल्या डान्ससह सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं.

हेलन या दिसायला इतक्या सुंदर होत्या की त्यांचे सौंदर्यच त्यांना त्रासदायक ठरु लागलं. सुंदर असल्याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला.

कधी कधी तर त्यांना छेडछाडीचा त्रासही सहन करावा लागला. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना काम थांबवणं शक्य नव्हतं.

त्यामुळे या छेडछाडीचा सामना करण्यासाठी त्यांनी एक शक्कल शोधून काढली. शुटिंगला जाताना हेलनजी बुरखा घालून घरातून बाहेर पडू लागल्या. त्यामुळे हेलनजींना ओळखणं शक्य नव्हतं. अशाप्रकारे त्यांनी छेडछाडीपासून स्वतःचा बचाव केला.

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यमात अनेक संघर्षाचा सामना केलेल्या हेलनच्या वैवाहिक आयुष्यही फार काही चांगले नव्हते. हेलन यांचं पहिलं लग्न त्याच्याहून 27 वर्षांनी मोठे असलेले दिग्दर्शक एन. पी. अरोरा यांच्याशी झालं होतं. मात्र हे लग्न फार काळ काही टिकले नाही. त्यांच्या 35 व्या वाढदिवसालाच त्यांनी हे लग्न मोडलं.

प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेलन या ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या दुस-या पत्नी आहे. दबंग खान सलमानच्या हेलन या सावत्र आई आहेत. मात्र आई म्हणून सलमान त्यांचा आपल्या आई इतकाच आदर करतो.

सलीम खान यांनी हेलनसह लग्न केल्यानंतर त्यांची मुले होवू न देण्याचेही कारण एका मुलाखतीत सांगितले होते. सलमान, सोहेल, अरबाज आणि अलवीरा, अर्पिता या मुलांना पाहून कोणत्या गोष्टीची कमी कधीच वाटली नाही.

हे पाहून हेलनलाही मुलांची कमी कधीच भासली नाही. मुलांनीही वेळेनुसार हेलनला स्विकारले. तिलाही तितकेच प्रेम दिले आणि हेलनेही मुलांना स्वतःच्या मुलासारखेच प्रेम करतात.

Read in English