आली लहर केला कहर ! रणवीर सिंगने शेअर केला Chi Look, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:20 PM2021-07-24T18:20:44+5:302021-07-24T18:31:28+5:30

रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या अभियाप्रमाणे त्याच्या स्टाईलमुळे जास्त चर्चेत असतो. तो जे काही करतो ते नेहमी हटके असते. बॉलिवूडमध्ये स्टाईच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणारा रणवीर पुन्हा एकदा लूकमुळेच चर्चेत आला आहे.

आपल्या भूमिकांसोबतच रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो.

त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच चर्चेत असते.

शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं.

दरवेळी रणवीर आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो.

त्यामुळेच की काय नुकतंच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

सोशल मीडियावर असे एक ना एक हटके लूक तुम्हाला रणवीर सिंगचे पाहायला मिळतील.

रणवीरचा हा लुक पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अनेकदा तो त्याच्या या अतरंगी लूकमुळे ट्रोलही होत असतो.

अनेकदा चाहते त्याचे असे लूक पाहून हैराणही होतात.