कोण आहे ओडिशाची ही ‘अप्सरा’ जिच्यावर फिदा आहेत राम गोपाल वर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:43 PM2020-07-08T16:43:05+5:302020-07-08T16:55:03+5:30

एका रात्रीत बनली इंटरनेट सेन्सेशन...

‘क्लायमॅक्स’ व ‘नेकेड’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता ‘थ्रीलर’ नावाच्या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात त्यांनी ओडिशाच्या एका अभिनेत्रीला कास्ट केलेय. तिचे नाव अप्सरा राणी.

राम गोपाल वर्मांनी शोधलेली ही हिरोईन एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

अप्सरा राणी दुसरी कुणी नसून तेलगू अभिनेत्री अंकेता महाराणा आहे. तेलगू इंडस्ट्रीतील ती एक ओळखीचा चेहरा आहे.

अप्सरा राणीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

आरजीवी वर्ल्ड थिएटरच्या आगामी चित्रपटाची हिरोईन अप्सरा राणी. या चित्रपटाचे नाव असेल थ्रीलर, अशी घोषणा नुकतीच रामगोपाल वर्मा यांनी केली होती.

यानंतर त्यांनी अप्सराचे एका पाठोपाठ एक 8 फोटो शेअर केले होते.

अप्सराही ओडिशाची आहे. आोडिशात तिचा जन्म झाला. ती लहानाची मोठी झाली ती डेहराडून येथे.

सध्या अप्सरा हैदराबादेत राहते. पण थ्रीलर हा या अप्सरेचा पहिला सिनेमा नाही. याआधी ऊलाला ऊलाला व फोर लेटर्स या सिनेमांत तिने काम केलेय.

राम गोपाल वर्मा यांचे मानाल तर अप्सराही ही एक उत्तम डान्सर आहे त्यापेक्षा उत्तम अभिनेत्री आहे.

रामगोपाल वर्मांच्या या टिष्ट्वटनंतर अप्सराचे केवळ 7 तासांत 10 हजार फॉलोअर्स वाढलेत.

7 तासांत 10 हजार फॉलोअर्स वाढणे हे बॉलिवूडच्या न्यूकमर्स अ‍ॅक्टरच्या बाबतीतला विक्रम असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी म्हटलेय.

अप्सराने जुलै महिन्यात तिचे twitter अकाऊंट उघडले होते.