एका सिनेमासाठी किती फी घेतात भोजपुरीच्या या ‘टॉप’ बाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 08:00 AM2020-12-04T08:00:00+5:302020-12-04T08:00:02+5:30

भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच लोकप्रिय आहेत. मात्र अफाट लोकप्रियता मिळूनही मानधनाबाबतीत या नट्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या आसपासही नाहीत.

आम्रपाली दुबे- आम्रपाली दुबे हिची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. 2014 साली भोजपुरी इंडस्ट्रीत आलेली आम्रपाली एका सिनेमासाठी 25 ते 30 लाख रूपये घेते. ती भोजपुरीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे.

रानी चॅटर्जी- रानी चॅटर्जी भोजपुरीची बोल्ड अभिनेत्री आहे. एका सिनेमासाठी सुमारे 20 ते 25 लाख रूपये फी घेते.

अक्षरा सिंह- अक्षरा ही भोजपुरीची टॅलेंटेड अभिनेत्री. एका भोजपुरी फिल्मसाठी ती 15 ते 20 लाख फी घेते.

मोनालिसा - मोनालिसा केवळ भोजपुरी सिनेमाच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीचाही फेमस चेहरा आहे. एका भोजपुरी सिनेमासाठी ती 15 ते 20 लाख रूपये मानधन घेते.

प्रियंका पंडित - प्रियंका पंडित ही भोजपुरीत नव्याने आलेली अभिनेत्री. कमी वेळात तिने खूप नाव कमावले. एका सिनेमासाठी ती 10 ते 15 लाख रूपये चार्ज करते.

काजल राघवानी- काजल भोजपुरीची आघाडीची अभिनेत्री. एका सिनेमासाठी ती 8 ते 10 लाख रूपये मानधन घेते.

रिंकू घोष - भोजपुरी अभिनेत्री रिंकु घोष ही एका सिनेमासाठी 8 ते 10 लाख रूपये चार्ज करते.

पाखी हेगडे- भोजपुरीची बोल्ड अभिनेत्री पाखी एका सिनेमासाठी10 ते 12 लाख फी घेते.