नवरी नटली...! सुरू झाले राणा दुग्गबतीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 04:53 PM2020-06-21T16:53:19+5:302020-06-21T16:53:19+5:30

‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दुग्गबतीच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. राणाची होणारी वधू मिहिका बजाज हिचे पारंपरिक लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सेलिब्रेशन सुरु राहिल, असे लिहित मिहिकाने हे फोटो शेअर केले आहेत.

येत्या 8 ऑगस्टला राणा व मिहिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

लॉकडाऊन काळात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

आता लॉकडाऊन काळातच दोघांचे लग्न उरकणार आहे.

मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे.