राणा दग्गुबती आणि मिहिका बजाजच्या लग्नात या कलाकारांनी लावली हजेरी, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:37 PM2020-08-10T15:37:08+5:302020-08-10T15:37:08+5:30

राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज शनिवारी लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नात दक्षिणेच्या अनेक दिग्गज कलाकारही पोहोचले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PHOTO INSTAGRAM)

साऊथमध्ये आपल्या जबरदस्त अभिनेयासाठी राणा डग्गुबती ओळखला जातो. आपल्या कारकीर्दीत राणाने आतापर्यंत बॉलिवूड आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणी आपला ठसा उमटविला आहे. राणा बर्‍याचदा चर्चेत असतो. (PHOTO INSTAGRAM)

राणाने बाहुबलीमधील भल्लारदेवाच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकली. बॉलिवूड किंवा टॉलीवूडमधल्या कलाकारांच्या रिलेशनची नेहमीच चर्चा असते. (PHOTO INSTAGRAM)

राणा आणि मिहिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नात तेलुगू आणि मारवाडी रितीरिवाजांचे पालन करण्यात आले. (PHOTO INSTAGRAM)

दोघेही कलाकार लग्नात खूपच सुंदर दिसत होते. पारंपारिक धोतीमध्ये राणा डग्गुबती खूप हँडसम दिसत होता. (PHOTO INSTAGRAM)

हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये राणा डग्गुबती आणि मिहिका बजाजचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. वेंकटेश, सामंथा अक्किनेनी, राम चरण, अल्लू अर्जुन आणि नागा चैतन्य असे मोठे कलाकार लग्नाला उपस्थित होते. (PHOTO INSTAGRAM)

कोविड -19 च्या सर्व खबरदारी विवाह सोहळ्यात घेण्यात आली. (PHOTO INSTAGRAM)

यापूर्वी या दोघांच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (PHOTO INSTAGRAM)