पहिल्यांदा रोमँटिक अंदाजात दिसले रामायणामधील 'लक्ष्मण' सुनील लहरी, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:12 PM2020-06-26T16:12:46+5:302020-06-26T16:12:46+5:30

रामानंद सागरच्या रामायणात लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर आपले पहिले रोमँटिक पोस्टर शेअर केले आहे.

सुनील यांनी शेअर केलेले हे पोस्टर त्यांच्या आई बरसात या सिनेमाचे आहे ज्यात नीलम आणि अनिरुद्धने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

फिर हुई बरसात 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सुनील यांचा पहिला रोमँटिक चित्रपट होता.

सुनील लहरी यांनी पोस्टर शेअर करताना एक कॅप्शन लिहिले आहे, “माझे पहिले रोमँटिक पोस्टर आणि सिनेमातील गाण्यांसाठी LP रेकॉर्ड प्लेअरचे बॅक कव्हर

चित्रपटाचे शीर्षक हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत पोस्टरवर लिहिलेले आहे.

सुनील लहरी यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांमध्ये काम केले.

रामायणानंतर या चित्रपटात काम करणाऱ्या सर्व मुख्य कलाकारांची लोकप्रियता इतकी वाढली होती की त्यांना अनेक ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

टॅग्स :रामायणramayan