पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:21 PM2020-06-01T19:21:41+5:302020-06-01T19:30:30+5:30

बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज आपला 50वा वाढदिवस साजरा करतो आहे.

माधवनने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

थ्री इडियट्स, रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, रामजी लंदनवाले, तनु वेड्स मनु असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत.

१९९६ साली माधवनने त्याचा पोर्टफोलिओ मॉडेलिंग एजेंसीला दिला. त्याचे पर्सनॅलिटी पाहून त्याला जाहिरातीची ऑफर मिळू लागल्या.

१९९६ साली त्याने सँडलवूड टॉक जाहिरातीत काम केले. या जाहिरातीचे दिग्दर्शक संतोष सिवान यांनी मणिरत्नम यांना सांगितले की पुढील प्रोजेक्ट इरुवरमध्ये कास्ट केले. हा माधवनचा पहिला चित्रपट जो सुपरहिट ठरला.

माधवनला सिनेमा मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागली नाही. त्यानंतर त्याचे एकानंतर एक चित्रपट हिट ठरत गेले आणि पाहता पाहता तो स्टार बनला.

१९९८ साली माधवनने इंग्रजी सिनेमा इन्फर्नोमध्ये काम केले. यात त्याने भारतीय पोलिसाची भूमिका केली होती.

माधवनला रहना है तेरे दिल में या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

माधवनची दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. पण त्याचसोबत तो बॉलिवूडमधील देखील आघाडीचा अभिनेता आहे.

माधवनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. साया, बनेगी अपनी बात, घर जमाई या त्याच्या मालिका चांगल्याच गाजल्या होत्या.