कधी कधी अस्वस्थ होते पण बदललेलं शरीर...! वाढत्या वयावर पहिल्यांदा बोलली प्रियंका चोप्रा

Published: May 13, 2021 06:40 PM2021-05-13T18:40:51+5:302021-05-13T19:22:14+5:30

ग्लोबल स्टार असाल म्हणून निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच. प्रियंका चोप्राला सुद्धा नाहीत. होय, प्रियंकाला स्वत:लाही याची जाणीव आहे.

ग्लोबल स्टार असाल म्हणून निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच. प्रियंका चोप्राला सुद्धा नाहीत. होय, प्रियंकाला स्वत:लाही याची जाणीव आहे.

एका ताज्या मुलाखतीत प्रियंका वयानुसार शरीरात होणा-या बदलांवर बोलली. वय वाढत आहे आणि याची जाणीव तिला आहे.

मुलाखतीत ती यावरच बोलली, माझे वय वाढतेय. सर्वांचे वाढते, तसेच माझेही वाढतेय आणि मी हे कधीच स्वीकारले आहे, असे ती म्हणाली.

15 वर्षांपूर्वी मी जसे जिसायचे, तशी आत्ता दिसू शकत नाही, आता मी अशी दिसते, पण ठीक आहे. मी जशी आहे, तशी आहे. याचा स्वीकार मला करावाच लागेल, असे ती म्हणाली.

10-15 वर्षांपूर्वीचे शरीर आणि आत्ताचे शरीर निश्चितपणे बदल झालाये. कधी कधी मी यामुळे अस्वस्थ होतेही. पण अशावेळी मला ज्यातून आनंद मिळतो, अशा गोष्टी मी शोधते, असेही तिने सांगितले.

आत्मविश्वास आणि दुसºयाला इम्प्रेस करण्याचा गुण माझ्याजवळ आहे आणि माझे शरीर कसे दिसते, याच्याशी त्याचे काहीही देणेघेणे नाही/ शरीरातील बदल माझा आत्मविश्वास कमी करू शकत नाहीत, असेही ती म्हणाली.

अलीकडे प्रियंकाचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

लवकरच प्रियंका मॅट्रिक्स व टेक्स्ट फॉर यू या सिनेमात दिसणार आहे. हे दोन्ही हॉलिवूड सिनेमे आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English