STUNNING! प्रियंका चोप्राचं इंटरनॅशनल मॅगझिनसाठी सुपर बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 06:07 PM2022-01-14T18:07:42+5:302022-01-14T18:26:55+5:30

Priyanka Chopra Latest Photoshoot : होय, प्रियंकाने एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी कधी नव्हे इतक्या बोल्ड पोझ दिल्या आहेत...

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राची आता नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. अ‍ॅक्टिंगसोबतच तिच्या स्टाईलवरही चाहते फिदा आहेत.

तूर्तास चर्चा आहे ती पीसीच्या नव्या फोटोशूटची. होय, प्रियंकाने एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट केलं आहे. रेड कलरच्या ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये तिनं कधी नव्हे इतक्या बोल्ड पोझ दिल्या आहेत. पण यात कुठेही तिने बॉडी रिव्हील केली नाही.

व्हॅनिटी फेअर मॅगझिनच्या फेब्रुवारी 2022 च्या कव्हर पेजसाठी प्रियंका चोप्राने हे फोटोशूट केलं आहे..

प्रियंकाने या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि ते पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

तिच्या या नव्या फोटोशूटवर सोनम कपूरने, ‘सुंदर! चा अभिमान असणे...’ असे म्हटले आहे. तर, अर्जुन कपूरने फायर इमोजी शेअर केला आहे.

पोल्का-डॉटेड आउटफिटमध्ये तिचा स्टनिंग लुकही बघण्यासारखा आहे. तिने हा लुक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फोटो शेअर केला आहे.

तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूड चित्रपटात ती सेलीन डिऑनसोबत दिसणार आहे.