प्रियंका इतकीच ग्लॅमरस आहे तिची बहीण मीरा चोप्रा, पाहा स्टाइलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:12 PM2020-06-01T17:12:49+5:302020-06-01T17:24:41+5:30

प्रियंकाच्या बहीणीचे ग्लॅमरस अदा

प्रियंका चोप्रा हिला सगळेच ओळखतात़ पण तिची चुलत बहीण मीरा चोप्रा ही सुद्धा प्रियंका इतकीच सुंदर व एक दमदार अभिनेत्री आहे.

बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथ इंडस्ट्रीत मीरा चोप्रा एक मोठे नाव आहे.

2008 साली तामिळ चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

काही हिंदी सिनेमातही ती झळकली आहे.

गँग आॅफ घोस्ट, कलंक, 1920 लंडन या बॉलिवूडच्या सिनेमात तिने काम केलेय.

2014 मध्ये शरमन जोशीच्या ‘1920 लंडन’ या चित्रपटातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला होता.

मीरा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅटिव्ह आहे.

रोज नवे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.

बॉलिवूडमध्ये प्रियंका चोप्राची बहीण म्हणून नाही तर एक उत्तम अभिनेत्री अशी ओळख तिने निर्माण केली आहे.