'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 10:37 AM2021-09-16T10:37:35+5:302021-09-16T10:43:23+5:30

बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते.

प्रीती झांगियानीने दक्षिणात्य सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

प्रीतीचा हा पहिलाच सिनेमा होता.‘मोहब्बतें’ हा सिनेमा 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या सिनेमात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

‘मोहब्बतें’च्या यशानंतर प्रीती झांगियानीची रसिकांमध्ये खूप चर्चा झाली होती.

पण ती हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

बॉलिवूडमध्ये प्रीतीला फार काही चांगले यश मिळाले नाही.

बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती चाहत्यांच्या लक्षात आहे.

प्रीती झांगियानीमध्ये काळानुसारही फार बदल झाला आहे.

तिचा बदललेला अंदाज पाहून चाहतेही आश्चर्य व्यक्त करतात.

पूर्वीप्रमाणेच ती आजही तितकीच सुंदर आणि फिट दिसते.