न्यूडिटी म्हणजे एक कला...! पोर्नोग्राफी व न्यूडिटीमधला फरक सांगताना पूनम पांडे काय म्हणाली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:21 PM2021-07-28T17:21:49+5:302021-07-28T17:31:24+5:30

Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे सतत तिच्या बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता ती राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सतत तिच्या बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता ती राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आहे.

होय, राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर पूनम पांडे व शर्लिन पांडे या दोघींची चर्चा होतेय. या दोघींसोबत राज कुंद्राने करार केला होता.

आता या प्रकरणाच्या निमित्ताने पूनमचा न्यूडिटीवरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात ती न्यूडिटीवर भरभरून बोलताना दिसतेय.

न्यूडिटी ही एक कला आहे. याकडे कला याच दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे, असे ती म्हणतेय.

राज कुंद्राच्या अ‍ॅपवरचे व्हिडीओ पॉर्न या श्रेणीत येत नसून इरोटिका म्हणजेच न्यूडिटीच्या श्रेणीत येतात, असा अनेकांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पूनमचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

‘गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी मला फोन आणि मेसेज करून पॉर्नोग्राफी आणि इरॉटिकातील फरक विचारला. मला फार काही ज्ञान नाही. पण मला न्यूडिटीचा अर्थ माहित आहे. कारण मी न्यूड फोटोशूट केले आहेत,’ असे ती व्हिडीओत म्हणतेय.

पुस्तकाच्या दुकानातून तुम्ही कामसूत्र पुस्तक विकत घेऊ शकतो. 70 च्या एम एफ हुसैन यांनी अनेक न्यूड चित्र काढली आहेत. आपल्याकडे अशी अनेक सुंदर मंदिर आहेत. तिथल्या नग्न मूर्ती तुम्ही पाहा. ही सर्व एक सुंदर कला आहे. न्यूडिटीकडे कला म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे तिने म्हटलेय.

न्यूडिटी एक कला आहे आणि हीच कला आमच्या सिनेमातही दिसते. न्यूडिटी एक कला म्हणून दाखवली जाते. मी तरी याबद्दल हाच विचार करते, असेही तिने म्हटले आहे.

पूनमने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती. 2013 साली नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.