आता मुक्काम तुरुंगात! अटकेनंतर पहिल्यांदा समोर आले राज कुंद्राचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:12 PM2021-07-20T18:12:20+5:302021-07-20T18:25:55+5:30

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला काल सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम बँचनं अटक केली.

आज पोलिसांनी राज कुंद्राला मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

राज च्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे.

राजला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता.

अभिनेत्री गहना वशिष्ठला पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.

शिल्पा शेट्टी नामवंत अभिनेत्री आहे, तिचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशीही जवळीक आहे. मात्र, पतीच्या अटकेनंतर कुणीही कामी येताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी शिल्पाचा शोच्या शूटिंगचा शेड्यूल होता. मात्र, ती शूटसाठी गेली नाही. कारण सोमवारी रात्रीच तिचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

उद्योगपती राज कुंद्रा शिल्पा शेट्टीसोबत दुसरा विवाह करण्यापूर्वी एवढा चर्चेत नव्हता. मात्र शिल्पासोबतच्या विवाहानंतर तो चर्चेत राहू लागला. त्यासोबतच त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!