Photos: अभिनेत्री रेखा यांचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले असे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो फक्त पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:30 PM2020-05-24T19:30:00+5:302020-05-24T19:30:00+5:30

अभिनेत्री रेखा यांचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले असे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून म्हणाल क्या बात है!

तारूण्यातील रेखा यांचे बोल्ड फोटो पाहून विसराल आताच्या टॉपच्या अभिनेत्रींना

उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.

रेखा यांनी फक्त त्यांच्या काळातच नाही तर आताही त्यांच्या स्टाईल व सौंदर्यानं सर्वांना भुरळ पाडली आहे.

रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.

रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती.

त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.

त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.

रेखा यांनी काजोलसोबत एक फोटोशूट केलं होतं. या फोटोची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

त्याकाळी त्यांनी केलेलं फोटोशूट खूप बोल्ड मानलं जातं.

रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री असून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात.

त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते. या वयातही त्या एकट्या राहतात. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल ट्रोल केलं जातं. तरीदेखील त्या बिन्धास्त आहेत.

वयाच्या ६४ व्या वर्षीदेखील रेखा यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं ही कमालीची बाब आहे.

रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.

रेखा सध्या चित्रपटात पहायला मिळत नसल्या तरी त्या टेलिव्हिजनवरील शोज व पुरस्कार वितरण कार्यक्रमात नेहमी पहायला मिळतात.

पूर्वी सगळे त्यांच्या सौंदर्याचे दीवाने होते. तसेच आतादेखील त्या तितक्याच सुंदर दिसतात. त्यांचं ग्लॅमर अजूनही कमी झालेलं नाही.

रेखा या अनेक राज्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्या बिहारच्या ब्रँड अॅम्बेसेडर होत्या. त्याचेही रेखा यांना मानधन मिळतं.

त्यामुळंच बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून रेखा यांची गणना होते.

टॅग्स :रेखाRekha