PHOTOS: वडील जगदीप यांच्या निधनामुळे जावेद जाफरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, दिसला भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 11:18 AM2020-07-09T11:18:13+5:302020-07-09T11:29:57+5:30

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व कॉमेडियन जगदीप जाफरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व कॉमेडियन जगदीप जाफरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. 

जगदीप दीर्घकाळापासून आजारी होते. बुधवारी त्यांचे निधन झाले.

जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे.

‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

त्याचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.

जगदीप यांच्या अंतिम संस्कारीची तयारी करताना जावेद जाफरी दिसले होते.

जावेद आणि त्याची पत्नी हबीबा मुंबईतील यारी रोड येथील त्यांच्या घराबाहेर दिसले. ते दोघे एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत.

जाफरी कुटुंब आणि विशेष करून जावेदसाठी हा खूप कठीण काळ आहे. जावेदचे आपल्या वडिलांवर खूप जीव होता. जावेदला जगदीप यांचा मुलगा असल्याचा खूप गर्व होता.