IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 08:00 AM2021-01-20T08:00:00+5:302021-01-20T08:00:02+5:30

असा झाला होता महेश भट्ट-परवीन बाबी यांच्या लव्हस्टोरीचा अंत...!

70 व 80 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीने 2005 साली आजच्याच दिवशी (20 जानेवारी) जगाचा निरोप घेतला होता.

परवीनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये दीवार, नमक हलाल, अमर अकबर अँथनी, शान, क्रांती, महान अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आजसुध्दा हे सिनेमे पाहिल्यास या ग्लॅमरस अभिनेत्रीच्या आठवणी ताज्या होतात.

1976 ते 80 दरम्यान परवीन बॉलिवूडची सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दुस-या क्रमांकावर होती. सिल्व्हर स्क्रिनवर परवीनचे आयुष्य अगदी वेगळे होते. पण ख-या आयुष्यात तिच्या इतकी एकटी तिच होती.

आयुष्याचे शेवटचे दिवस एक व्हिल चेअर, दोन कपडे, औषधे, पेंटींग्स आणि कॅनव्हास या वस्तूसोबत घालवण्याची वेळ तिच्यावर आली. आयुष्यभर एकाकीपण भोगलेल्या परवीनचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. 20 जानेवारी 2005 रोजी मुंबईच्या जुहूस्थित घरात तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

परवीनने लग्न केले नाहीत. पण तिची अनेक अफेअर गाजलीत. परवीनला तिनदा प्रेम झाले. महेश भट्ट, अभिनेता कबीर बेदी आणि डॅनी डेंजोंग्पा हे परवीनच्या आयुष्यात आलेले चर्चित पुरूष. अमिताभसोबतही तिचे नाव जोडले गेले. महेश भट्टसोबतचा तिचा लव्ह सीन बरीच वर्षे चालला. महेश भट्ट यांनी त्यांच्या व परवीनच्या आयुष्यावर आधारित ‘लम्हें’ हा चित्रपटही काढला.

महेश भट्टच्या प्रेमात पडली तेव्हा परवीनचे करिअर एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले होते. महेश भट्ट विवाहित होते. मात्र 1977 मध्ये दोघांनीही जगाची पर्वा न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

पत्नीला सोडून महेश भट्ट परवीनसोबत राहू लागले. जवळजवळ दोन वर्षे दोघेही लिव्ह इनमध्ये राहिले. मात्र 1979 साली महेश भट्ट यांनी असे काही पाहिले की, त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.

होय, परवीनने फिल्मी कॉच्युम घातला होता आणि घराच्या एका कोप-यात ती अंग चोरून बसली होती. तिच्या हातात चाकू होता. महेश यांना पाहून परवीनने त्यांना शांत राहण्याचा इशारा केला.

शांत राहा, खोलीत कोणीतरी आहे. तो मला मारण्याचा प्रयत्न करतो आहे, असे ती बडबडू लागली. परवीनच्या या वागण्याने महेश यांना धक्का बसला. कारण त्यांनी कधीच तिचे हे रूप पाहिले नव्हते.

पुढे पुढे परवीन सतत अशी वागू लागली. डॉक्टरांनी तिला सिजोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाल्याचे निदान केले. महेश भट्ट यांनी बड्या बड्या डॉक्टरांना दाखवले. पण परवीनचा आजार कमी होण्याऐवजी बळावला.

अशी वेळ आली की, परवीनला घरात कोंडून ठेवावे लागले. यादरम्यान तिचे वजन वाढले.

महेश भट्ट एका रात्री परवीन बाबी यांच्याबरोबर बेडरूममध्ये होते. तेव्हा परवीनने युजीसह मैत्री ठेवली तर मला कींवा युजी दोघांपैकी एकालाच निवडावे लागेल असे सांगितले. महेश भट्ट यांनी असे ऐकताच रागाच्या भरात तडकाफडकी तिथून बाहेर पडले आणि परवीन अगदी नग्नावस्थेत त्यांच्यामागे धावत सुटली.

महेश आणि परवीन बाबी यांच्या अफेअरची कधी नव्हे इतकी चर्चा झाली होती. पण परवीन बाबी यांच्या मानसिक आजाराने या नात्याचा अंत झाला. तो दिवस परवीन व महेश भट यांच्या नात्याचा शेवटचा दिवस ठरला.