निक जोनस या गोष्टीशिवाय राहूच शकत नाही, प्रियंका चोप्रानं शेअर केलं बेडरूम सीक्रेट

Published: May 8, 2021 05:16 PM2021-05-08T17:16:43+5:302021-05-08T17:19:41+5:30

अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते.

कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये प्रियंका सध्या निकसोबत अमेरिकेत आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने तिच्या व नवरा निक जोनासचे बेडरूम सीक्रेट सांगितले होते. यादरम्यान प्रियंकाने सांगितले होते की, तिचा नवरा या गोष्टीशिवाय राहू शकत नाही.

प्रियंकाच्या सांगण्यानुसार, जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा निकला सर्वात आधी माझा चेहरा पहायचा असतो. त्यानंतर मी त्याला मी सांगते की एक मिनिट थांब, मी जरा मॉश्चरायजर व मस्कारा लावते. झोपेतून उठल्यावर चेहरा थोडा डल वाटतो. पण निकला तोच चेहरा सुपर स्वीट वाटतो.

निक म्हणतो की मला तुला असेच पहायला आवडते. एक पती पत्नीमध्ये असेच नाते असले पाहिजे. जिथे कोणतीही बंधन नाहीत आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम असेल.

प्रियंका सांगते की प्रत्येक पत्नीला आपला नवरा असाच काहीसा हवा असतो. थोडे विचित्र वाटते. पण निकला आवडते की त्याला मला निरखायला आवडते. ही मस्करी नाही हे खरे आहे.

प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, ते दोघे एकमेकांना न पहाता एक ते दीड आठवड्यांहून जास्त दिवस राहू शकत नाही. आमच्या दोघांचे आपापले करियर आहे. तरीदेखील आम्ही प्रयत्न करत असतो की जगात कुठेही असलो तरी कमीत कमी भेटत रहायचे.

प्रियंका व निक जोनसने १ व २ डिसेंबर, २०१८ला राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग पार पडले होते. त्या दोघांचे लग्न जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडले होते.

प्रियंका आणि निक सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!