लग्नाआधीच या अभिनेत्री बनल्या आई, नावे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 08:00 AM2020-06-02T08:00:00+5:302020-06-02T08:00:02+5:30

लग्नाच्याआधी आजवर अनेक अभिनेत्री आई बनल्या आहेत. नताशा लवकरच हार्दिक पांड्याच्या बाळाची आई बनणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. नताशा आणि हार्दिक यांनी जानेवारीत साखरपुडा केला होता.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी १९९६ मध्ये लग्न केले. लग्नाच्याआधीच श्रीदेवी गरोदर होती. लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर तिने जान्हवीला जन्म दिला.

महिमा चौधरी देखील लग्नाच्याआधीच गरोदर होती असे म्हटले जाते.

अमृता अरोराचे लग्न बिझनेसमन शकील सोबत झाले आहे. अमृता गरोदर आहे हे त्यांना कळल्यानंतर त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

कोंकणा सेन शर्मा गरोदर असताना तिने आणि रणवीर शौरी यांनी लग्न केले. पण हे लग्न काहीच काळ टिकले.

लीजा लग्नाच्याआधी गरोदर असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.

एमी जॅक्सन गरोदर असताना तिने तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला. ती गरोदर असल्याची बातमी तिनेच सोशल मीडियाद्वारे दिली होती.

कल्कीला ७ फेब्रुवारीला बाळ झाले असून तिने अद्याप तिच्या प्रियकरासोबत लग्न केलेले नाही.

अर्जुन रामपालची प्रेयसी गैब्रिएला डेमेट्रिएड्सने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

नेहा आणि अंगद बेदी यांनी लग्न करण्याआधीच ती गरोदर होती. नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' में या कार्यक्रमात अंगद बेदीनेच या गोष्टीची कबुली दिली होती.