ब्लॅक स्विमसूटमध्ये मौनी रॉय दिसली खूप ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 01:33 PM2021-03-01T13:33:44+5:302021-03-01T13:33:44+5:30

नुकतेच मौनी रॉयने आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ब्लॅक स्विमसूटमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी रॉय ब्लॅक स्विमसूटमध्ये ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळाली.

मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी रॉय कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती.

मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचार कोर्स केला. त्यानंतर तिने टीव्ही जगतात एन्ट्री केली.

मौनी रॉय मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेमुळे घराघरात पोहचली.

मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरची मालिका क्यों सास भी कभी बहूमधून केली होती.

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १६.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.