रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड आहे कालीन भैयाची मोलकरीण राधा, फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:00 AM2020-10-31T08:00:00+5:302020-10-31T08:00:02+5:30

राधाही ही भूमिका जिवंत करणा-या अभिनेत्रीचे नाव आहे प्रशंसा शर्मा.

नुकताच ‘मिझार्पूर’ या वेबसीरीजचा दुसरा सीझन रिलीज झाला. सध्या या सीझनवर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. सीरिजच्या या दुस-या सीझनमध्ये महिलांचा बोलबाला आहे. मग ती गोलू गुप्ता असो, कालीन भैय्याची पत्नी बीना असो वा त्याची मोलकरीण राधा असो. आज याच राधाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कालीन भैय्याची मोलकरीण राधा संपूर्ण सीरिजमध्ये काहीशी भेदरलेली, घाबरलेली दिसते. मुन्ना त्रिपाठी व सत्यानंद त्रिपाठी तिचे शोषण करतात. मात्र सरतेशेवटी ती या शोषणाचा सूड घेते.

राधाही ही भूमिका जिवंत करणा-या अभिनेत्रीचे नाव आहे प्रशंसा शर्मा.

सीरिजमध्ये सर्वांना घाबरून राहणारी ही राधा ख-या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाल तर तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो बघून तुम्हीही थक्क व्हाल.

प्रशंसा शर्मा ही मूळची झारखंडची आहे. डेहराडूनच्या वेलहम गार्ड स्कूलमधून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले.

यानंतर दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजात पदवी घेतली. यानंतर प्रशंसा मायानगरीत आली.

मुंबईत तिने अभिनयाचे धडे गिरवले. प्रशंसाला ‘मिर्झापूर’ सीरिजने खरी ओळख दिली.

Goatbait आणि Office Vs. Office आणि या सिनेमात प्रशंसाने काम केलेय.

2015 साली आलेल्या ‘बेक्ड’ या वेबसीरिजमधून तिने डेब्यू केला होता.