फॅमिली प्लॅनिंगबद्दल काही विचार ? चाहत्याचा प्रश्न अन् मिलिंद सोमणच्या बायकोचं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:41 PM2021-06-10T14:41:01+5:302021-06-10T15:01:58+5:30

फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न एका चाहत्याने अंकिताला केला. त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman)आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर (Ankita Konwar ) बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहेत.

मिलिंद सोमण आणि अंकिता कधी फिटनेसमुळे तर कधी रोमॅन्टिक फोटोंमुळे चर्चेत असतात.

मिलिंदने स्वत:पेक्षा 26 वर्षांनी लहान अंकितासोबत लग्नगाठ बांधली आणि ही जोडी अचानक चर्चेत आली. आता ही जोडी पुन्हा चर्चेत आहे कारण काय तर फॅमिली प्लॅनिंगवरचे उत्तर.

होय, नुकताच अंकिताने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

साहजिकच चाहत्यांनी अंकितावर प्रश्नांचा भडीमार केला. यातलाच एक प्रश्न होता फॅमिली प्लानिंबद्दलचा.

तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे? असा प्रश्न एका चाहत्याने अंकिताला केला.

त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही एक प्लॅन फॅमिली आहोत,असे मजेशील उत्तर अंकिताने दिले.

अंकिता आणि मिलिंदने 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये लग्न केले होते. यानंतर 2019 मध्ये अंकिता आणि मिलिंदने स्पेनमध्ये देखील लग्न केले.

अंकिता आणि मिलिंदमध्ये 26 वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले. पण अंकिता आणि मिलिंद यांनी कधीच या ट्रोलिंगची पर्वा केली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English