‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनने केले ‘आत्मनिर्भर’ फोटोशूट; पाहा, डेनिम लूकमधील स्टाइलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:16 PM2020-06-03T16:16:08+5:302020-06-03T16:30:28+5:30

आत्मनिर्भर फोटोशूट!!

बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन हिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या फोटोशूटला रवीनाने ‘आत्मनिर्भर’ नाव दिले आहे.

खास म्हणजे, या फोटोशूटसोबत रवीनाने निसर्ग चक्रीवादळासाठी सज्ज राहण्याचे म्हटले आहे.

‘आत्मनिर्भर’ फोटोशूट, निसर्ग चक्रीवादळ येण्यापूर्वी चेकलिस्ट... आणीबाणीच्या काळात बॅटरी चार्ज ठेवा. गरजेच्या वस्तू सोबत ठेवा. एक चांगला सिनेमा फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवा, असे तिने फोटो शेअर करताना लिहिले आहे.

सर्वजण सुरक्षित राहा. चक्रीवादळ फार हानी करणार नाही अशी मी आशा करते. मुंबईकर हिंमतीने या संकटाचा सामना करतील, असेही तिने लिहिले आहे.

‘आत्मनिर्भर’ नावाच्या या फोटोशूटमध्ये रवीनाने स्टाइलिश फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रवीना डेनिम लूकमध्ये दिसतेय.

रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे.

लॉकडाऊनआधी रवीना ‘केजीएफ- चॅप्टर 2’च्या शूटींगसाठी हैदराबादेत गेली होती.

रवीनाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. आजही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या.

‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.