बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने अभिनेत्रीने लोकांना लावले होते वेड, सर्व काही सोडून घेतला संन्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:46 PM2021-04-21T19:46:38+5:302021-04-21T19:58:03+5:30

90 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून ओळख निर्माण करणारी ममता आता साध्वी झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या ममताने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे.

90 च्या दशकात ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक गणली जायची. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने लोकांना वेड लावले होते.आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या.

1991 मध्ये ममताने आपल्या करिअरची सुरुवात 'ननबरगल' या तामिळ चित्रपटद्वारे केली होती. 1992 मध्ये 'तिरंगा' चित्रपटाद्वारे तिने बी-टाऊनमध्ये पदार्पण केले.

1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमातून ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात ममताने छोटी भूमिका साकारली होती. 1993 मध्ये ‘आशिक आवारा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमाने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली.

या सिनेमासाठी तिला ‘फिल्मफेअर न्यू फेस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ती 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' या चित्रपटांमध्ये झळकली. 2002 मध्ये आलेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा सिनेमा, यानंतर ती सिनेमात झळकली नाही.

याच दरम्यानच्या काळात ममता कुलकर्णीने टॉपलेस फोटोशूट केले आणि वादाच्या भोवऱ्या सापडली. फोटोशूट रसिकांना रुचलं नाही. अनेकांनी या फोटोशूटवरुन ममता कुलकर्णीवर टीकाही केली होती. हे फोटोपाहून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.

इतकंच नाहीतर काही लोकांनी ममता कुलकर्णीला ठार मारण्याचीही धमकी दिली होती.स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हर शूटसाठी नवीन चेहरे शोधले जात असताना अनेक अभिनेत्रींनी नकार दिला.

त्याचवेळी ममता कुलकर्णी यांचे नाव सुचविण्यात आले आणि ममतानेही लगेचच फोटोशूट करण्यास सहमती दर्शविली. जेव्हा हे फोटोशूट साधं सुध नसून टॉपलेस असणार आहे हे सांगण्यात आले तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मॅगझिन पब्लिश होताच ममता विरोधात निदर्शने करण्यात आली. एकीकडे रसिकांचा संताप होत होता तर दुसरीकडे आमिर खान, सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मात्र ममताच्या या फोटोशूटचे आणि धाडसाचे कौतुकही केले.

गेल्या दोन दशकांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या ममताने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी चर्चा एकवटणारी ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. बॉलिवूडला रामराम ठोकून आता तिने अध्यात्माच्या मार्ग निवडला आहे.

ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर ड्रग तस्करी करणारा विजय गोस्वामीच्या नावासह तिचे नाव जोडले गेले होते. ड्रग तस्करीच्या प्रकरणात विजय गोस्वामीला नंतर अटक झाली.

Read in English