लग्नाच्या वृत्ताची चर्चा सुरू असताना मलायका अरोरा पुन्हा आली चर्चेत, तेही बोल्ड फोटोंमुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 02:21 PM2019-03-30T14:21:48+5:302019-03-30T14:29:21+5:30

मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. त्यात आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायकाने स्विमिंग पूलजवळील तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मलायका अरोराच्या फोटोंना इंस्टाग्रामवर खूप लाईक्स मिळत आहेत.

मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलायका व अर्जुन पुढच्या महिन्यात म्हणजेच १९ एप्रिलला लग्नबेडीत अडकणार आहेत.

इतकेच नाही तर मीडियाने तर त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची यादीदेखील बनवली आहे.

मलायका व अर्जुन यांच्या वयात बारा वर्षांचे अंतर आहे. अर्जुन मलायकापेक्षा लहान आहे.

हा विवाह ख्रिश्चन रितीरिवाजात पार पडणार आहे. अमृता अरोरा व करिना कपूर खान मलायकाचे ब्राइड्समेट असणार आहेत.

अरबाज खानसोबत १७ वर्षे संसार केल्यानंतर मलायकाने घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका व अर्जुनच्या अफेयरच्या चर्चेला उधाण आले.