मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 08:35 PM2021-01-15T20:35:56+5:302021-01-15T20:40:10+5:30

दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

मलायका सोशलवर नेहमीच अॅक्टीव असते आणि चाहत्यांसाठी नेहमीच हॉट फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा सुट्टीचा आनंद घेत आहेत.

दोघांनाही एकमेकांना क्वॉलिटी टाईम देता यावा यासाठी हे अधून-मधून व्हॅकेशन प्लॅन करत असतात.

मलायका अरोरा सध्या तिच्या बोल्ड फोटोंसोबत आपल्या लव लाइफमुळे चर्चेत आली आहे.

सतत दोघे एकत्र फिरताना पाहायला मिळतात.

45 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.

काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला होता.

फोटो शेअर होताच काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.

जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती.