एका निर्णयामुळे सलमानच्या हिरोईनचे संपले फिल्मी करिअर,जाणून घ्या सध्या ती काय करते...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:23 PM2021-07-22T19:23:56+5:302021-07-22T19:34:11+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी भाग्यश्री.

नव्वदीच्या दशकातला सुपरडुपर हिट चित्रपट 'मैने प्यार किया' मधील भाग्यश्री आज सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या सिनेमाच्यावेळी भाग्यश्री फक्त 18 वर्षांचीच होती.

भाग्यश्री आणि सलमान खान या जोडीला रसिकांचीही प्रचंड पसंती मिळाली. भाग्यश्रीने साकारलेली सूमनची रसिकांना प्रचंड भावली. आजही सुमन भूमिका रसिकांच्या लक्षात आहे.

या सिनेमामुळे भाग्यश्री एका रात्रीत सुपरस्टार बनली होती. एकीकडे फिल्मी करिअर ओघात असतानाच सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच तिने लग्नही केले होते. मुळात भाग्यश्रीच्या कुटुंबालाही हे लग्न मान्य नव्हते.

मुळात लग्न करण्याआधी भाग्यश्रीने हिमालयला काही प्रश्न विचारले होते. केवळ १५ मिनिटांतच विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची हिमालयनेही भाग्यश्रीला हवी तशी उत्तरं दिली आणि तेव्हाच तिने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाग्यश्रीची सुरूवात तर दमदार होती. पण तिचे फिल्मी करिअरला उतरती कळा लागली. 'मैने प्यार किया'मध्ये काम केल्यानंतर तिने वयाच्या 19व्या वर्षी हिमालय दसानीसोबत लग्न केले.

संसारात रमल्यानंतर ती फारशी सिनेमात झळकली नाही. 90व्या दशकात तिचा 'घर आया मेरा परदेसी' हा सिनेमा 1993मध्ये रिलीज झालेला शेवटचा सिनेमा होता.

त्यानंतर तिने दिर्घकाळ बॉलिवूडमध्ये ब्रेक घेतला आणि 2001मध्ये 'हॅलो गर्ल्स'मधून पुनरागमन केले. त्यानंतर 2006मध्ये रिलीज झालेला 'हमको दीवाना कर गये' सिनेमात ती छोट्या रोलमध्ये दिसली होती.

भाग्यश्री आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे.भाग्यश्रीला २३ वर्षांचा मुलगा आहे. अभिमन्यू असे त्याचे नाव आहे आणि मुलगी २१ वर्षांची आहे. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी गाठलेली भाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसते.

कंगणा राणौतच्या थलैवी सिनेमात 11 वर्षानंतर ती झळकणार आहे.तिचे सौंदर्य या वयातही अबाधित आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती आजच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. तिचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणेही कठीणच.