मैंने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:09 PM2021-07-28T15:09:35+5:302021-07-28T15:28:29+5:30

'मैने प्यार किया' सिनेमानंतर भाग्यश्रीने लग्न केले आणि खासगी आयुष्यात रमली.भाग्यश्री तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. भाग्यश्री चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलीय तिच्या लेकीचा हा खास फोटो.

वयाच्या ५२ व्या वर्षीही भाग्यश्री खूप सुंदर दिसते. फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.

सौंदर्याच्या बाबतीत आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते.

सौंदर्याच्याबाबतीत भाग्यश्रीची लेकही कमी नाही.

लेकीचे नाव अवंतिका आहे. ती २२ वर्षाची आहे.

अवंतिका लंडनमध्ये राहत असून तिथे उच्च शिक्षणाचे धडे घेत आहे.

अवंतिका आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे.

भाग्यश्रीचे लेकीसोबत अनेक फोटो पाहायला मिळतात.

आईप्रमाणेच अवंतिकाही मॉर्डन विचारांची आहे.