लग्न, ते काय असतं?, वयाच्या १७ व्या वर्षीच झाला संजय दत्तच्या हिरोइनचा पहिला घटस्फोट, आता राहते लिव्ह-इनमध्ये, एका मुलीची आहे आई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 11:30 AM2020-12-19T11:30:20+5:302020-12-19T11:39:57+5:30

माही गिलचा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण लग्न केले किंवा नाही केले त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही.

'साहब बीवी और गैंगस्टर 3' सारख्या सुपरहिट सिनेमात झळकत रसिकांची पसंती मिळवलेली अभिनेत्री माही गिल आता 45 वर्षाची झाली आहे. 19 डिसेंबर 1975मध्ये चंडीगढमध्ये तिचा जन्म झाला होता.माही गिल तिच्या करियरला सुरूवात 2003मध्ये केली होती. 'हवाएं' हा तिचा पहिला सिनेमा होता.

मात्र पाहिजे तसे यश माहीला मिळाले नाही. यानंतर तिने 2009 मध्ये 'देव डी' सिनेमा केला आणि याच सिनेमातून ती ख-या अर्थाने प्रकाझोतात आली. तसेही माही गिल तिच्या कामापेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. वयाच्या 17व्या वर्षीच माहीने लग्न केले होते.

खूप कमी लोकांना माही विवाहीत असल्याचे माहिती आहे. तिचे हे लग्न फारकाळ काही टिकले नाही. घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती. 2019मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगितले होते.

तिला एक मुलगीही आहे वेरोनिका असे तिचे नाव आहे.तिच्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलणे तिला आवडत नाही त्यामुळे नेहमीच यावर बोलणे ती टाळते.

माहीच्या आयुष्यात अनेक चढउतार आली आहेत. मात्र या गोष्टीचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा , ती एका मुलीची आई असून याच गोष्टीचा तिला जास्त आनंद आहे. 2020 ऑगस्टमध्ये माहीची मुलगी चार वर्षाची झाली आहे. माही अजूनही लग्न करण्याच्या विचारात नाही.

आपल्याकडे लग्नाआधीच आई होण्याला अतिशय वाईट जनरेने पाहातात हा दृष्टीकोण बदलणे गरजेचे आहे असे ती म्हणते. नक्कीच लग्न करणे हा वेगळाच अनुभव आहे.ण खरंच लग्न करणे इतके गरजेचे आहे का हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असल्याचे ती म्हणते.

माही सध्या लिव-इन पार्टनर आपल्या मुलीसह गोवामध्ये राहते.नुकतेच गोव्याच्या समुद्रकिनारी मजा मस्ती करताना दिसली होती. तसेच अधून-मधून माही मुंबईला येत जात असते.सलमान खानच्या 'दबंग 2' में काम केल्यानंतरही पाहिजे तशा भूमिका ऑफर झाल्या नसल्याचे ती म्हणते.

सिनेमात अरबाज खानच्या पत्नीच्या भूमिकेत माही झळकली होती. सिनेमात तिच्या वाट्याला अगदी छोटी भूमिका आली होती. मात्र या भूमिकेमुळे तिला मोठ्या भूमिका न मिळता छोट्याच भूमिका ऑफर होतात. यानंतर 'दबंग 3' मध्ये देखील माहीला संधी मिळाली नाही.

रिजर्व राहणेच पसंत करते. जास्त मित्र - मैत्रीणी नसून मोजकेच मात्र खास मित्रांच्या सहवासात राहायला तिला आवडते.लोकांनी माझ्या आयुष्याबाबत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये हेच मला जास्त आवडते. माझ्या नियमांवर आयुष्य जगते असेही माही सांगते.

माही गिलने आतापर्यंत फक्त 33 सिनेमात काम केले आहे. 'खोया खोया चांद', 'देव डी', 'गुलाल', 'दबंग', 'साहब बीवी और गैंगस्टर', 'साहब बीवी और गैंगस्टर रिटर्न्स', 'साहब बीवी और गैंगस्टर 3', 'माइकल', 'पानसिंह तोमर',' दबंग 2', 'जंजीर', 'बुलेट राजा', 'अपहरण' आणि 'दुर्गामती' हेच हिट ठरले आहेत.