महेश मांजरेकरांची थोरली लेक आहे खूप ग्लॅमरस, तिच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:00 AM2021-10-22T07:00:00+5:302021-10-22T07:00:00+5:30

महेश मांजरेकर यांची थोरली लेक सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

महेश मांजरेकर यांची थोरली लेक सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. त्यातील सई मांजरेकर हिने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

'दबंग 3' चित्रपटानंतर सईलाही सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली आहे.

सई सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सईच्या फोटोंना खूप पसंती मिळते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सई मांजरेकर दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खानचा जावई आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात पहायला मिळाली. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.

त्यानंतर आता ती मेजर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.