या आलिशान घरात राहते बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित,पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 11:37 AM2020-07-16T11:37:31+5:302020-07-16T11:44:39+5:30

आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने.

माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

माधुरीच्या आलिशान घराचे फोटो समोर आले आहेत.

माधुरीच्या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास २5० कोटींच्या घरात आहे.

मुंबईमधील पालाटियल भागामध्ये माधुरीचा बंगला आहे.

माधुरी मुंबईमधील बंगल्यात पती श्रीराम नेने आणि दोन मुले अरिन-रेयानसोबत राहते.

केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा माधुरी आलिशान आयुष्य जगते.

माधुरीचे घर तर अतिशय आलीशान आहे.

माधुरीला नृत्याची आणि संगीताची आवड असल्याने तिने त्यासाठी घरात एक वेगळी रुम तयार केली आहे.

येथे ती कथ्थक करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी माधुरीने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल.

Read in English