अबब ! तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धकधक गर्ल माधुरी दीक्षित, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

Published: May 15, 2021 10:00 AM2021-05-15T10:00:00+5:302021-05-15T10:00:02+5:30

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे माधुरी दीक्षितने दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. (Photo Instagram)

माधुरी दीक्षित एका चित्रपटासाठी 50 लाख ते एक कोटी रुपये मानधन घेते. सध्या ती फार कमी सिनेमांमध्ये काम करते आहे. तरीदेखील एका सिनेमासाठी ती चार ते पाच कोटी रुपये घेते. (Photo Instagram)

माधुरीचे मुंबई व अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तसेच तिच्याकडे रेसिडेन्शिएल अपार्टमेंट व कमर्शिएल प्रॉपर्टी आहे. (Photo Instagram)

मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी त्यांनी फ्लोरिडामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसेच मियामीमध्ये मॉलदेखील विकत घेतला आहे. तसेच तिच्याकडे ऑडी, रॉल्स रॉयस व स्कोडा रॅपिड सारख्या लक्झरी गाड्यादेखील आहेत. (Photo Instagram)

या व्यतिरिक्त रिएलिटी शोचे परीक्षण करण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय एंडोर्समेंटचे वेगळे चार्जेस घेते. चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मानधन मिळते. (Photo Instagram)

माधुरी व तिचा नवरा मागील पाच वर्षांपासून युरेका फोर्ब्सचे अॅम्बेसिडर आहेत आणि त्यासाठी ते 100 कोटी रुपये चार्ज घेतात. (Photo Instagram)

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)

‘एक दो तीन’ मुळे प्रसिद्ध झालेला ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरीच्या करिअरच्या यशाचा आलेख वाढत गेला. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!