IN PICS : अन् घाबरून आमिर खानने माधुरीसोबत डान्स करायला दिला होता नकार...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 08:00 AM2021-02-21T08:00:00+5:302021-02-21T08:00:02+5:30

वाचा, ‘धकधक गर्ल’ माधुरी व तिच्या डान्सबद्दलचे इंटरेस्टिंग किस्से...

माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते. आईकडून माधुरीला डान्सची प्रेरणा मिळाली. आज आम्ही तुम्हाला माधुरी व तिच्या डान्सबद्दल अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.

माधुरीच्या आईला डान्स आणि गाण्याची आवड होती. पण ती शिकू शकली नाही. कारण त्या काळात महिलांनी नृत्य करणे समाजमान्य नव्हते. मात्र माधुरीच्या आईने आपल्या मुलींना डान्स शिकवण्याचा निर्णय घेतला. माधुरीची मोठी बहीण कत्थक डान्सर आहे. बहिणीला पाहून माधुरीही अडीच-तीन वर्षांची असल्यापासून डान्स करू लागली होती.

दूरदर्शनच्या एका मुलाखतीत माधुरीने बिरजू महाराजांबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, ‘मी बिरजू महाराजांची मोठी चाहती आहे. अमेरिकेत मी त्यांचा एक शो पाहिला होता. यानंतर मी त्यांचा वर्कशॉप ज्वाईन केला होता. अच्छा तुला डान्स शिकायचा आहे तर, असे मला पाहताच ते म्हणाले होते. मी हो म्हटल्यावर, आधी मला एक, दोन, तीन... गाण्यातील बॅक मोमेंट करून दाखव तेव्हाच मी तुला शिकवेल, असे मला म्हणाले होते.’

माधुरीसोबत डान्स करताना मोठमोठ्या अभिनेत्यांना टेन्शन यायचे. साहजिकच माधुरीसोबत डान्स करण्याआधी त्यांना रिहर्सलमध्ये घाम गाळावा लागायचा.

आमिर खानने याच कारणाने ‘दम दमा दम’ या गाण्यावर नाचण्यास सुरुवातीला नकार दिला होता.

‘दम दमा दम’ या गाण्यात कठीण स्टेप्स होत्या. शिवाय सोबत माधुरी होती, याचे आमिरला जाम टेन्शन आले होते.

माधुरी इतकी उत्तम डान्सर आहे. तिच्यासोबत डान्स म्हणजे स्वत:चे हसे करण्यासारखे आहे, असे मला वाटले होते म्हणून मी या गाण्यावर डान्स करायला नकार दिला होता. पण इंद्रकुमार यांनी खूप समजवल्यानंतर मी तयार झालो होतो, असे आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते.

एक दोन तीन या गाण्याने माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. या गाण्यासाठी माधुरीने 17 दिवस सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली होती. तू तयार आहेस, असे सरोज खान यांनी सांगूनही ती अथक प्रॅक्टिस करत राहायची. खुद्द सरोज यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.