'लय भारी' फेम अभिनेत्री अदिती पोहनकरच्या बिकनीतल्या बोल्ड फोटोंची होतेय चर्चा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:59 PM2022-05-13T16:59:17+5:302022-05-13T17:18:36+5:30

Aditi Pohankar: लय भारी फेम अभिनेत्री अदिती पोहनकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकरने कमी कालावधीत सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. अदिती सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तसेच तिचे फोटो व्हायरल होताना दिसतात.

अदिती पोहनकर नुकतीच चर्चेत आली आहे. तिचे बिकनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटोशूट जुने आहेत. मात्र ते आता चर्चेत आले आहेत.

या फोटोत समुद्रकिनारी अदिती पोहनकर बिकनीत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

अदिती पोहनकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळताना दिसते आहे. तसेच ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.

अदिती पोहनकरने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली.

हिंदी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती रितेश देशमुखच्या 'लयभारी' या चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटानंतर अदितीने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले. त्यानंतर ती शी या वेबसीरिजमध्येही झळकली होती. तिच्या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आता तिचा शी या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.

अदितीने बॉबी देओलसोबत आश्रम या वेबसीरिजमध्ये पहलवान पम्मीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते. आता आश्रम सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.