लावता पैज? हे फोटो पाहून तुम्हीही या अभिनेत्याला ओळखू शकणार नाही!!

Published: June 17, 2021 11:36 AM2021-06-17T11:36:41+5:302021-06-17T11:55:04+5:30

आपल्या भूमिकेसाठी लुक व गेटअप चेंज करणे बॉलिवूड स्टार्ससाठी नवे नाही. आता अशाच एका बॉलिवूड स्टार्सने काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तुम्हीही कन्फ्युज झाल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या भूमिकेसाठी लुक व गेटअप चेंज करणे बॉलिवूड स्टार्ससाठी नवे नाही. आता अशाच एका बॉलिवूड स्टार्सने काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तुम्हीही कन्फ्युज झाल्याशिवाय राहणार नाही.

कुणालने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर वेगवेगळ्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये त्याला ओळखणे कठीण झाले आहे. एका फोटोत तो साध्वीच्या रूपात आहे, एका फोटोत खलनायकाच्या, एका फोटोत वृद्ध व्यक्तिच्या तर एका फोटोत पंजाबी व्यक्तिच्या गेटअपमध्ये तो दिसतोय.

अभिनेता होणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला विविध रुपं धारण करता येतात,असे कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत.

कुणालचा ‘कोई जाने ना’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटासाठी त्याने ही विविध रुपं धारण केली असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्याच्या या फोटोंवर सध्या लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडतोय.

कुणाल कपूर हा बॉलिवूडचा एक गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो.

डॉन, गोल्ड, रंग दे बसंती, बचना ऐ हसीनो यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.

कुणालने मिनाक्षी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!