बिकनी फोटोवरुन ट्रोल करणा-याला Krishna Shroff चे सडेतड उत्तर, म्हणाली तुझे खूप खूप आभार पण......

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:42 PM2021-04-13T16:42:28+5:302021-04-13T16:53:18+5:30

Krishna slams troll for criticising her bikini pic: टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा तिच्या हॉट बिकिनी लूक ने सोशल मिडियावर धुमाकुळ घालत असते.सतत ती तिचे बोल्ड फोटोशूट चाहत्यांसह शेअर करत असते.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो दिसतील.

यात अधिक तर तिचे बिकनी लूकमधले फोटोच जास्त दिसतात.

कृष्णा श्रॉफनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले होते.

ज्यात ती बिकीनीमध्ये दिसली होती. त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.

एका युजरने कृष्णाला बिकीनी फोटो तुझे हे फोटो आई-बाबा पाहात नाहीत का? असा प्रश्न विचारला

युजरच्या प्रश्नावर कृष्णानेही गप्प न राहता बिनधास्त उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.

'ही चिंता व्यक्त केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार पण तू नरकात जा' इथवरच कृष्णा थांबली नाही.

'कोणीतरी माझा मेसेज त्याला ट्रान्सलेट करून सांगा' कृष्णाच्या या बिनधास्त उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

कृष्णाला अशा प्रकारे ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या आधीही अनेकदा बिकनी फोटोंवरून तिला ट्रोलिंग समोरं जावं लागलं आहे.

ट्रोलिंगचा कृष्णा श्रॉफला अजिबात फरक पडत नाही.

ती नेहमीच बोल्ड फोटोंमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.