असे नेमकं काय घडलं की,अमेरिकेत जवळपास 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर माधुरी दीक्षित परतली भारतात ?

Published: May 15, 2021 02:12 PM2021-05-15T14:12:38+5:302021-05-15T14:34:31+5:30

अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत. आपला अभिनय, आपलं घायाळ करणारं हास्य, आपल्या दिलखेचअदा, नृत्य याने माधुरीने रसिकांवर मोहिनी घातली. हिंदी चित्रपटसृष्टीत एक आघाडीची अभिनेत्री असं स्थान माधुरीने अनेक वर्ष जपलं.

माधुरीने लग्नानंतर आपली नवी इनिंग हिंदी चित्रपटसृष्टीत सुरु केली. लग्नानंतरही तिची जादू काही कमी झाली नाही. ​याशिवाय विविध डान्स रियालिटी शोच्या जजच्या भूमिकेतही माधुरी पाहायला मिळाली.

श्रीराम नेने यांच्याशी पहिली भेट लॉस एंजेलिस भावाच्या पार्टीत झाली होती. त्यावेळी माधुरीसाठी कुटुंब लग्नासाठी स्थळ शोधतच होते.

आश्चर्याची बाब म्हणजे माधुरी ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री असल्याचे श्रीराम नेने यांना माहितच नव्हते..पहिल्या भेटीनंतर दोघांची मस्त मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

ोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. माधुरीने श्रीरामनेने यांच्याशी लग्न केले तेव्हा तिचे करिअर शिखरावर होती.

ऐन करिअर भरात असताना माधुरीने लग्न कले आणि लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. जवळपास १२ वर्ष माधुरी कुटुंबासोबत अमेरिकेत राहत होती.अमेरिकेत सुखाने संसार सुरु होता.

अमेरिकेत राहत असताना एक गोष्ट माधुरीला स्वस्थ बसू देत नव्हती ते म्हणजे अभिनय करणं.अभिनयापासून काही वर्ष दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

ीराम नेनेंसाठी माधुरीने तिचे करिअर सोडले होते. पण लग्नानंतर श्रीराम नेने सुध्दा केवळ माधुरीसाठी तिच्यासोबत भारतात परतले आणि ​इथेच कायमचे स्थायिक झाले.

अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात सेवा देत आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे माधुरी दीक्षितने दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे.

माधुरी दीक्षित एका चित्रपटासाठी 50 लाख ते एक कोटी रुपये मानधन घेते. सध्या ती फार कमी सिनेमांमध्ये काम करते आहे. तरीदेखील एका सिनेमासाठी ती चार ते पाच कोटी रुपये घेते.

माधुरीचे मुंबई व अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तसेच तिच्याकडे रेसिडेन्शिएल अपार्टमेंट व कमर्शिएल प्रॉपर्टी आहे.

काही वर्षांपूर्वी त्यांनी फ्लोरिडामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसेच मियामीमध्ये मॉलदेखील विकत घेतला आहे. तसेच तिच्याकडे ऑडी, रॉल्स रॉयस व स्कोडा रॅपिड सारख्या लक्झरी गाड्यादेखील आहेत.

या व्यतिरिक्त रिएलिटी शोचे परीक्षण करण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय एंडोर्समेंटचे वेगळे चार्जेस घेते. चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मानधन मिळते.

माधुरी व तिचा नवरा मागील पाच वर्षांपासून युरेका फोर्ब्सचे अॅम्बेसिडर आहेत आणि त्यासाठी ते 100 कोटी रुपये चार्ज घेतात.

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.

आजही तिच्या सौंदर्यावर लाखों चाहते फिदा होतात. तिची एक झलक पाहण्यासाठी तितकेच आतुर असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!