करिश्मा शर्माने बोल्ड फोटो शेअर करत लिहिले, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 08:00 AM2021-01-08T08:00:00+5:302021-01-08T08:00:02+5:30

करिश्मा शर्मा तिच्या इन्स्टा फोटोंमुळे सतत चर्चेत असते. सध्या तिच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

बॉलिवूड व टीव्ही अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या इन्स्टा फोटोंमुळे सतत चर्चेत असते. सध्या तिच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

करिश्माचे हे नवे फोटो पाहून त्यावरून नजर हटत नाही. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

हे फोटो शेअर करताना करिश्माने एक कविता पोस्ट केली आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा..., असे तिने लिहिले आहे.

क्यों तू ऐसे पल खोता है, दिल आखीर तू क्यों रोता है, अशा या कवितेच्या ओळी आहेत.

आहट, पवित्र रिश्ता, सिलसिला प्यार का, लव्ह बाय चान्स यांसारख्या मालिकांमध्ये करिश्मा शर्माने काम केले आहे.

अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

करिश्मा बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या या स्वभावाला साजेशे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

करिश्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

2015 मध्ये ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

यानंतर हॉटेल मिलन, फसते फंसाते अशा चित्रपटात ती झळकली. 2017 मध्ये ‘रागिनी एमएमएस-रिटर्न’ या वेबसीरिजमधील तिच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती.